






विद्याप्रसारक मंडळाच्या विदयामंदिर (दहिसर) शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कोतुक सोहळा शालेय सभागृहात शनिवारी पार पडला. यंदा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारस्वत बँकेचे संचालक किरण उमरूटकर होते. याप्रसंगी माध्यमिक शालान्त परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या ८२ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. वेदांत चव्हाण हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी ९९.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला, त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुचिता देशपांडे (शाळा समिती अध्यक्ष इंग्रजी माध्यम), नेहा काळे (उपमुख्याध्यापिका, इंग्रजी माध्यम), अनुया केळुस्कर (कार्यवाह), राजीव जोशी (उपाध्यक्ष), सुधीर देसाई (मुख्याध्यापक), राजेंद्र गोस्वामी (शाळा समिती अध्यक्ष मराठी माध्यमिक विभाग) आदी उपस्थित होते.