मराठी भाषा गौरव दिन सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या उपस्थितीत विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
अवंतिका,अवघाचि हा संसार,माझ्या नवऱ्याची बायको आणि यासारख्या अनेक मालिका लेखन आणि शीर्षक गीत लेखन करणाऱ्या रोहिणी मॅडम यांच्याशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संवाद साधला,त्यांच्या या क्षेत्राविषयी आणि मराठी भाषेविषयी त्या भरभरून बोलताना म्हणाल्या की जिद्द,लेखन वाचन आणि निरीक्षण या गोष्टी विद्यार्थ्यांनी विकसित केल्या तर मराठी मालिका लेखन क्षेत्रात यश मिळू शकते.
काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर पोवाडा, गाणी आणि कविता सादर केल्या.
या प्रसंगा ची क्षणचित्रे
मराठी भाषा गौरव दिन
Admissions open for the academic year 2025-26 English Secondary Section celebrated the National Science Day on 28th February, 2025