सोमवारी दिनांक २ फेब्रुवरी २०२६ रोजी कै. भाई सुर्वे सभागृहात इयत्ता ५ वि ते १० वि शालेय बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इयत्ता १० विची सर्वोकृष्ट विद्यार्थिनी कु. तेजस्विनी खताळ, आदर्श व अष्टपैलू विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या रुपेश परब व कु. वैष्णवी दीपक पाटील यांनी इयत्ता ५ वि ते १० वि पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्यपर्शधांमध्ये यश संपादन केले, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्बतके बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. तसेच या तिघींनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माननीय मुख्याध्यापक श्री. देसाई सिरांनी त्या तीनही विद्यार्थ्यांचे कौतुक करून इतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व प्रमुख पाहुण्यांचा बहुमान मिळण्षियासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला हवे याबद्मादल मार्गदर्शन केले. अशा प्रकारे शालेय पारितोषिक समारंभ अतिशय आनंदात संपन्न झाला.



