VPMDahisar

इयत्ता दहावी : निरोप समारंभ

Batch 2025-26

शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवरी २०२६ रोजी विद्या प्रसारक मंडळातफे इयत्ता दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री. सुरेशभाई ठाकूर यांना आमंत्रित केले होते. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थांना मंडळातफे निरोप देण्यात आला. यावेळी दोन्ही माध्यमातूिन १० वी अ ब क च्या विद्यार्थांने आपले मनोगत व्यक्त केले व शाळेविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मराठी माध्यमाच्या सौ. सायली राणे व इंग्रजी माध्यमाच्या सौ. पूजा भोसले या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यां बद्दलच्या भावना व्यक्त करून त्यांना आशीर्दवाद दिले.

यावेळी शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री. देसाई सर यांने मुलांना आशीर्दवाद देऊन शालान्त परीक्षेच्या संदर्मभात महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच इंग्रजी माध्यमाच्या उपमुख्याध्यापिका सौ. नेहा काळे मॅडम यांनीही विद्यार्थांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. या काययक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपजथित असलेल्या माननीय सुरेशभाई ठाकूर सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्या प्रसारक मंडळाचे माननीय कार्यवाह श्री. राहुल केळकर सरांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांकडून देणगी देण्यात आली. विद्यार्थ्यांना अतिशय आनंदात निरोप देण्यात आला.

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar