इयत्ता आठवीचे विद्यार्थी हे पौगंडावस्थेत आलेले असतात. अशा वेळी पालकांशी असलेले नातेही थोडेसे दुरावलेले असते, त्यांना मित्रमैत्रिणी अधिक जवळचे वाटू लागतात. पालकांनाही या सर्व गोष्टी समजून घेणे कठीण जातं. तसेच मुला मुलींमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात.
अशावेळी पालकांना मुलांशी संवाद कसा साधावा याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. म्हणून विद्या प्रसारक मंडळातर्फे इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ हा उपक्रम गेली २१ वर्षे राबविला जात आहे.
१ र्फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता कै. भाऊ ठाकूर सभागृहात ‘सुजाण पालकत्व’ हा कायक्रम संपन्न झाला. यावेळी प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आशिष देशपांडे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम मराठी व इंग्रजी माध्यमांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता. मुलांविषयीच्या अनेक समस्या, त्यावरचे उपाय डॉक्टरांनी या कार्यक्रमातून समाजावून सांगितले. यावेळी पालकांनी आपल्या मनातील समस्या , प्रश्न विचारून शंकांचे डॉक्टरांकडून निरसनही केले. अतिशय नियोजन पद्धतीने हा कायक्रम संपन्न झाला व त्यास पालकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला.



