गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी कै. भाई सुर्वे सभागृहात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता मार्गदर्शन‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास नौदलाचे निवृत्त कमांडर श्री. राजीव कुबल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच बरोबर माननीय श्री. अभिषेक कुबल हे सुद्धा उपस्थित होते.
श्री. कुबल यांनी आपल्या मार्गदर्शनात भावना म्हणजे काय?, राग, ताण, आनंद यांचा योग्य वापर कसा करायचा? मित्र आणि कुटुंबांशी चांगले संबंध कसे ठेवायचे ? तसेच एक चांगला माणूस बनण्यासाठी या सर्व गोष्टींचा कसा उपयोग होतो? या संदर्भात कमांडर श्री. कुबल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माननीय उपमुख्याध्यापिका श्रीम. सुनंदा जोगी मॅडम, माननीय पर्यवेक्षक श्री. विठ्ठल सुळे सर व पालकवर्ग उपस्थित होते. आजच्या स्पर्धात्मक जगात अभ्यासाबरोबरच आपल्या भावना समजून घेणे व त्यावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य तो निर्णय घेणे या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे सर्व विवाथ्वीमध्ये भावी जीवनात नक्कीच बदल होईल.

