VPMDahisar

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा २०२५–२६

मराठी माध्यमिक विभाग

बुधवार, दिनांक २१/०१/२०२६ रोजी मराठी माध्यमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पहिल्या मजल्यावरील मोकळ्या प्रांगणात संपन्न झाला. विद्या प्रसारक मंडळाच्या हितचिंतकांनी सढळ हस्ते दिलेल्या देणगीच्या व्याजातून ही पारितोषिके दिली जातात.

विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळवलेल्या यशाची पोचपावती म्हणजे आजचा हा पारितोषिक वितरण सोहळा होय. मागील वर्षी इयत्तानुसार मिळवलेले प्रथम क्रमांक, बहिःशाल परीक्षांतील भरघोस यश, इयत्ता दहावीच्या वर्षात सर्वोत्तम व आदर्श विद्यार्थी यांची निवड करून हा सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यास बालसाहित्यिक रमेश तांबे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांसमोर सुश्राव्य काव्यवाचन सादर केले. विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट काव्यवाचनाचा आनंद अनुभवला. तसेच तांबे सरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

विद्या प्रसारक मंडळाच्या भरघोस पाठिंब्यामुळे आजचा पारितोषिक वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar