VPMDahisar

मराठी माध्यमिक विभाग प्रवेशोत्सव २०२६

शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ ची सुरुवात सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी प्रवेशोत्सवाने झाली. मुलांच्या स्वागतासाठी मराठी माध्यमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र गोसावी सर, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. सुधीर देसाई सर व माननीय उपमुख्याध्यापिका श्रीम.सुनंदा जोगी मॅडम उपस्थित होत्या. तसेच शालान्त परीक्षा मार्च २०२६ मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या कु. साजिरी प्रभू, कु. तेजस्विनी खताळ, कु. ऐश्वर्या परब व कु. अंतरा तांबे ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. माननीय मुख्याध्यापक श्री. देसाई सरांनी विद्यार्थ्यांना शालेय परिसरात कसे वागावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले. माननीय श्री. गोसावी सरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आणि उप मुख्याध्यापिका सौ सुनंदा जोगी मॅडम यांनी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत टंकसाळी सरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले.
अशाप्रकारे उत्साहवर्धक वातावरणात शालेय नवीन वर्षाची सुरुवात झाली.

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar