VPMDahisar

शाळेचा वर्धापन दिन – १८ जून २०२६

विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर, दहिसर. मराठी माध्यमिक विभाग

दि. १८ जून २०२६ रोजी विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर, दहिसर (मराठी माध्यमिक विभाग)  शाळेचा 64 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री .सुधीर देसाई सर यांनी शाळेच्या गौरवशाली परंपरेचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार व सर्वांगीण विकासाचा संदेश दिला.  उपमुख्याध्यापिका सौ जोगी मॅडम, पर्यवेक्षक श्री सुळे सर आणि सर्व सहकारी शिक्षक  तसेच इयत्ता पाचवी अ आणि पाचवी ब चे नवीन प्रवेश  घेतलेले विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत  आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

त्याचबरोबर आज शाळेचा वाढदिवस म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप देखील करण्यात आले.

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar