VPMDahisar

मराठी माध्यमिक विभाग ‘योगदिन’

21 जून योग दिनाच्या निमित्याने शनिवार दिनांक 20 जून रोजी विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर मराठी माध्यमिक विभागात  योगदिन साजरा करण्यात आला. योगदिन साजरा करण्यासाठी  ‘सहज योग साधना’ या संस्थेचे साधक बंधू यांच्याकडून विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व  पटवून देण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले, व विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे योगासने करून घेतली. या  प्रसंगी शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री सुधीर देसाई सर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा जोगी मॅडम व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar